महाराष्ट्र

ठाकरे सरकारने काढला ‘हा’ नवा आदेश

राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं नवं परिपत्रक

14 Oct :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

वाचा :- असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर कोसळले

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वाचा :- ‘मी कुणालाही किस करू शकतो’- ट्रम्प

शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही.

वाचा :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले बीडकरांना ‘विशेष’ आवाहन!

वाचा :- ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन!