‘मी कुणालाही किस करू शकतो’- ट्रम्प
ट्रम्पचे धक्कादायक विधान!
14 Oct :- अमेरिकाचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यामुळे जगाचे लक्ष वेधत असतात. तर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकतात. सध्या अमेरिकी अध्यपदाच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे. मात्र प्रचारादरम्यानच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्रा आता ते निरोगी झाले आहेत.कोरोनामुक्त झालेल्या ट्रम्प यांनी एका रॅलीमध्ये धक्कादायक विधान केले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
ट्रम्प म्हणाले की, कोरोनाच्या प्रयोगात्मक उपचारानंतर त्यांना ‘सुपरमॅन’ झाल्यासारखे वाटत आहे. या उपचारांमुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आहे.ट्रम्प यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर तीन-चार दिवस ते रुग्णालयात होते. ट्रम्प यांच्यावर प्रायोगिक अँटीबॉडी औषधाच्या मिश्रणानं उपाचर करण्यात आला.
वाचा :- असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर कोसळले
ट्रम्प यांनी मंगळवारी पेनसिल्व्हेनियात एका निवडणूक रॅलीत सांगितले की, मी काही औषध घेत होतो. त्यामुळे मी निरोगी होणार हे माहित होते. मात्र मला आता सुपरमॅन झाल्यासराखे वाटत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिकारशक्तीबद्दल सांगितले की आता माझी रोग प्रतिकारशक्ती वाढली आहे. मी खाली येऊन कोणाचेही चुंबन घेऊ शकतो. कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांना निवडणुकीच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.
वाचा :- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले बीडकरांना ‘विशेष’ आवाहन!
वाचा :- ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन!