भारत

असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर कोसळले

हत्तीवर बसून प्राणायाम करणे पडले महागात

14 Oct :- लोकप्रिय योग आभ्यासक योगगुरू बाबा रामदेव यांना हत्तीवर बसून प्राणायाम करणे चांगलेच महागात पडले. प्राणायाम करत असताना हत्ती असंतुलित झाल्याने बाबा रामदेव जमिनीवर आदळले. दरम्यान, त्यांना कोणतीही इजा झाली नाही, परंतु काही क्षणांसाठी तिथे उपस्थित लोकांना घाम फुटला. ही घटना गोकुळ रामनराती येथे असलेल्या कारशनी गुरुशरणानंदच्या आश्रमात सोमवारी घडली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

बाबा रामदेव योग कार्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच अनुषंगाने सोमवारी योग प्रशिक्षणादरम्यान त्‍यांची संत गुरुशरणानंदांच्या सुशोभित व सुंदर हत्तीकडे त्यांची नजर गेली. पूजा केल्यामुळे हा हत्ती बराच काळ आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे रामदेव बाबांना एक भलतीच कल्‍पना सुचली. त्यांनी थेट शिष्यांना हत्तीवर बसून योग शिकवण्यास सुरवात केली.

वाचा :- ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन!

भ्रामरी प्राणायमादरम्यान, हत्तीने शरीर वेगाने हलवले, तेव्हा बाबा रामदेव यांचे संतुलन बिघडले आणि ते थेट जमिनीवर कोसळले. अचानक झालेल्‍या या प्रकाराने आश्रमाचे सेवक त्यांच्याकडे धावत गेले. मात्र बाबांनी स्वत:ला सांभाळले. बाबा रामदेव यांचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काल सोमवार घडली. यामुळे बाबा रामदेव यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

वाचा :- कोरोना लसीच्या वितरणाविषयी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा!

वाचा :- अखेर राज्यपालांच्या पत्राने पवारांना दुःख झाले