भारत

कोरोना लसीच्या वितरणाविषयी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला खुलासा!

मंत्रिगटाच्या बैठकीत कोरोना लसीबाबद दिली माहिती!

13 Oct :- देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दररोज हजारो रुग्ण आढळून येत असून, कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच मंत्रिगटाच्या बैठकीत कोरोना लस व त्याच्या वितरणाविषयी महत्त्वाची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोना प्रतिबंधक लस २०२१ च्या सुरूवातीच्या काळात येण्याची आशा असून, अनेकांकडून लस पुरवली जाणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी केंद्रीय मंत्रिगटाची बैठक पार पडली. हर्ष वर्धन यावेळी बोलताना म्हणाले, आपल्याकडे एकापेक्षा जास्त कंपन्याकडून पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच लस येण्याची आम्हाला अपेक्षा आहे. देशात लसीचे वितरण कसे करावे, याविषयी योजना तयार करण्यासाठी तज्ज्ञांचा गट धोरण ठरवत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.

वाचा :- अखेर राज्यपालांच्या पत्राने पवारांना दुःख झाले

यापूर्वीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना लस येण्याबद्दल माहिती दिली होती. मंत्रिगटाच्या बैठकीत त्यांनी सरकारकडून लस वितरणाबाबत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. कोरोना लस २०२० च्या अखेरीपर्यंत नोंदणीसाठी तयार होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौमय्या स्वामीनाथन यांनीही सांगितले होते. स्वामीनाथन म्हणाल्या, तुम्हाला माहिती आहे की, आमच्याकडे सध्या ४० लस आता क्लिनिकल ट्रायल्सच्या टप्प्यात आहे. यापैकी १० लशी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

वाचा :- आता मिळणार वॉटरप्रूफ PVC आधारकार्ड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

ज्या लस चाचण्या शेवटच्या टप्प्यात आहे. ते आम्हाला आपल्या लसीच्या कार्यक्षमता व सुरक्षितता याविषयी सांगतील, असे त्या म्हणाल्या. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी कोरोना लसीच्या वितरणाबद्दल माहिती दिली होती. केंद्र सरकार सर्वांना व समान लसीच्या वितरणासाठी राज्याकडून माहिती घेत असल्याचे सांगितले होते. देशातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राथमिकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.

वाचा :- प्रसूतीनंतर 15 दिवसानेच कामावर रुजू झाली ‘ही’ सरकारी अधिकारी

वाचा :- कोरोना अंडर कंट्रोल; मात्र ‘या’ राज्यांनी वाढवली चिंता