भारत

कोरोना अंडर कंट्रोल; मात्र ‘या’ राज्यांनी वाढवली चिंता

रुग्णवाढीत घट पडल्याने मोठा दिलासा!

13 Oct :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यातील सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाच्या रूग्णांनी उच्चांकी गाठली होती. ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोच्या रूग्णांमध्ये घट होत असून कोरोनातून बरे होण्याच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असून देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

रुग्णांचा आकडा तब्बल 71 लाख वर पोहोचली आहे.कोरोनामुळे देशभरात एक लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.त्याचबरोबर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होताना देखील दिसून येत आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशभरात रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे.अनेक रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून कोरोनामुळं मृत पावणाऱ्या रुग्णांचा मृत्युदर देखील कमी झाला आहे.

वाचा :- अखेर राज्यपालांच्या पत्राने पवारांना दुःख झाले

सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठला होता. मात्र आता ऑकटोबर महिन्यात आलेल्या आकडेवारीमध्ये घट दिसून आल्याने मोठा दिलासा मिळत आहे.ऑकटोबर महिण्यात देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळं आगामी काळात रुग्णांची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरात 9,94,851 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत देशभरात 8 कोटी 78 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

वाचा :- आता मिळणार वॉटरप्रूफ PVC आधारकार्ड; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

मागील काही दिवसांत मृत्यूची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर आता यासंदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे.चार राज्यांनी देशाची चिंता वाढवली असून या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. केरळमध्ये मागील ११ महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

वाचा :- प्रसूतीनंतर 15 दिवसानेच कामावर रुजू झाली ‘ही’ सरकारी अधिकारी

जवळपास ६० टक्के वाढ झाली असून यामध्ये कोझीकोडमध्ये 62.2%, त्रिसूरमध्ये 61.9%, कोल्लम मध्ये 57.9% केसेस वाढल्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये 37.2%, कोडागू 32.2% आणि तुमाकुरू 28.7% तर पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये 38.%, वीरभूम 20.3% आणि नादिया जिल्ह्यामध्ये 19.5% कोरोना रुग्ण सापडत आहेत.

वाचा :- गुगल सर्चमध्ये राशिद खानची बायको ‘अनुष्का शर्मा’

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्याने केला ‘हा’ खुलासा