राजकारण

अखेर राज्यपालांच्या पत्राने पवारांना दुःख झाले

पत्रावरून राज्यात निर्माण झालं नवं वादळ

13 Oct :- राज्यातली मंदिरं खुली करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन छेडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. आणि हिंदुत्वाबाबात काही गोष्टीही सांगितल्या होत्या. त्या पत्रावरून राज्यात नवं वादळ निर्माण झालं आहे. राज्यापालांनी पत्रात जी भाषा वापरली ती घटनेला आणि त्या पदाला धरून नाही. त्यांचं पत्र वाचून मला धक्का बसला आणि दु:ख झालं अशी भावना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

शरद पवार आपल्या पत्रात म्हणतात, महाराष्ट्र सध्या कोरोनाविरुद्ध निकराची झुंझ देत आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत गर्दीची ठिकाणं लगेच खुली करणं योग्य होणार नाही. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपलं मत व्यक्त केलं आहे.

वाचा :- प्रसूतीनंतर 15 दिवसानेच कामावर रुजू झाली ‘ही’ सरकारी अधिकारी

राज्यपालांनी ज्या तत्परतेनं आपलं मत मांडलं ते स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये मोकळा संवाद असायलाच पाहिजे. मात्र राज्यपालांनी जी भाषा वापरली ती वाचून मला धक्का बसला आणि मी आश्चर्यचकीतही झालो आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असून त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं हे योग्य नाही. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ती त्या पदाला शोभणारी नाही.

वाचा :- सावधान! ‘या’ वस्तूंवर अनेक दिवस कोरोना विषाणू जिवंत राहतो

घटनात्मक पदाचा मान राहिला गेला पाहिजे. या पत्रामुळे मला अतिशय दु:ख झाले आणि ते तुमच्याजवळ मला व्यक्त करावं वाटलं, असंही पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. सिद्धिविनायक, पंढरपूर, शिर्डीचं साईबाबा मंदिर अशा ठिकाणी लोकमोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सध्या मंदिरे खुली करू नयेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला असून माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे असंही पवारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

वाचा :- गुगल सर्चमध्ये राशिद खानची बायको ‘अनुष्का शर्मा’

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्याने केला ‘हा’ खुलासा