सिनेमा,मनोरंजन

गुगल सर्चमध्ये राशिद खानची बायको ‘अनुष्का शर्मा’

गुगल बारमध्ये सर्च करा आणि पहा

12 Oct :- नक्कीच ऐकून आणि पाहून हे आश्चर्य वाटेल की जर तुम्ही अफगाण क्रिकेटर राशिद खानची पत्नी असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळेल. हो हे खरं आहे. याचा पुरावा म्हणून आम्ही इथे सर्चचा स्क्रिनशॉट देखील तुमच्या माहितीसाठी जोडला आहे.तुम्ही फक्त राशिद खान वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल अनुष्का शर्माच्या नावासोबत तिचा फोटो देखील दाखवेल.अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानचा जन्म १९९८ चा आहे. राशिद बद्दल सांगायचं झालं तर जून २०१८ मध्ये भारताविरोधात आफगाणिस्तानच्या पहिल्या टेस्टमॅचमध्ये खेळणा-या ११ क्रिकेटर्सपैकी तो एक होता. त्यानंतर बांग्लादेश विरोधातील मॅचमध्ये त्याने टीमचं नेतृत्व केलं होतं. याशिवाय तो सगळ्यात तरुण क्रिकेटर आहे जो २० व्या वर्षी टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन म्हणून राहिला होता.

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्याने केला ‘हा’ खुलासा

दुसरीकडे अनुष्का शर्मा विषयी सगळ्यांनाच माहित आहे. तीने ‘बँड बाजा बारात’, ‘पीके’, ‘रब ने बनादी जोडी’, ‘ए दिल है मुश्किल’ सोबत अनेक सिनेमात काम केलं आहे. तीने इटलीमध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न देखील केलं आहे आणि आता ती लवकरंच आई देखील होणार आहे.मात्र असं असतानाही गुगलमध्ये राशिद खानची पत्नी असं सर्च केल्यावर अनुष्का शर्माचं नाव आणि राशिद विवाहीत असल्याचं दाखवत आहे. आणि लग्नाच्या तारखेत विराट.सोबतच्या लग्नाची तारीख दाखवली जात आहे.

वाचा :- सावधान! ‘या’ भागामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

राशिदने एकदा लाईव्ह चॅटमध्ये त्याची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा असल्याचं म्हटलं होतं तेव्हापासून तो चर्चेत आलाय. सांगायची गोष्ट अशी की गुगल दाखवत असल्याप्रमाणे अनुष्का राशिदची पत्नी नाहीये. खरच तर राशिदचं लग्नच झालेलं नाही..त्याने एका मुलाखतीत हे देखील सांगितलं होत की तो तेव्हाच लग्न करेल जेव्हा आफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकेल.

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा

वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला