सिनेमा,मनोरंजन

गायक आदित्य नारायण अडकणार विवाह बंधनात!

नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पार पडणार विवाह सोहळा

12 Oct :- नुकतीच गायिका नेहा कक्करने तिच्या लग्नाची घोषणा केली. आता नेहाचा खास मित्र, गायक, अभिनेता आणि टीव्ही शोचा होस्ट आदित्य नारायणने देखील लग्न करत असल्याचे जाहीर केले आहे. नेहाच्या लग्नाच्या घोषणेनंतर आदित्यनेदेखील लग्न करत असल्याचे जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्य नारायण त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी विवाह बंधनात अडकणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. या वर्षाच्या अखेरीस, नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

वाचा :- दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्याने केला ‘हा’ खुलासा

याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहोत, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.

वाचा :- सावधान! ‘या’ भागामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

‘ तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत.

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा

वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला