महाराष्ट्र

दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण राज्यमंत्र्याने केला ‘हा’ खुलासा

ब्रिटनमधील 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले- बच्चू कडू

12 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावामुळे देशात अनलॉकचे सत्र सुरु आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विचार करत देशात अनेक ठिकाणी हॉटेल, रेस्टोरंट, बार, सिनेमागृह सुरु करण्यात आली आहे. आता शाळा,कॉलेजस कधी सुरु होतील हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यातील शाळा-महाविद्यालय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद असून शिक्षण विभागाकडून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. पण कोरोनाचे प्रमाण दिवाळीनंतरही वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच असेल माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

वाचा :- सावधान! ‘या’ भागामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी आता होऊ लागली आहे. राज्य सरकारने दिवाळीनंतर कोरोनाविषयी जाहीर केलेले नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बच्चू कडू यांनी वरील अंदाज व्यक्त केला आहे.

वाचा :- ‘महाराष्ट्रात डिसेंबर सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार आपण करत होतो. दिवाळीनंतर जर कोरोनाची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले, तर दिवाळीनंतरही शाळा आपल्याला बंदच ठेवाव्या लागणार आहेत.

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा

कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही, तेव्हा शाळा सुरू करता येतील. पण जगाचा विचार आपण केला तर ब्रिटनमधील 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

वाचा :- ठाकरे सरकारने घेतलेल्या ‘या’ निर्णयामुळे फडणवीस संतापले