बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज 78 नवे रुग्ण पॉझिटिव्ह!!

कोरोना पुन्हा अंडर कंट्रोल!

12 :- बीड जिल्यात कोरोना रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा समाधानकारक घटली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढ आटोक्यात येत असल्याचे समोर येत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये,गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.बीड जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या पसरावा मुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ लागले आहे.एकंदरीत कोरोना विषाणूच्या संक्रमना पासून स्वतः खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.माझी कुटुंब माझी जबाबदारी या योजने प्रमाणे प्रत्येकाने कोरोनाशी दोन हात करणे गरजेचे आहे. आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रुग्णवाढीत मोठी भर पडली आहे.आज बीड जिल्ह्यात 78 नवे रुग्ण आढळले आहेत.