भारत

म्हणून 15 तारखेपासून ‘शाळा’ सुरु करण्यास राज्यांची तयारी ‘नाही’

सध्या ‘ऑनलाईन’ शाळा हाच उत्तम पर्याय!

11 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र अनलॉकचे सत्र राबण्यात येत आहे. देशात सर्वत्र हळूहळू सर्व काही सुरु करण्यात येत आहे. सर्वाना सध्या मोठा प्रश्न पडला आहे की शाळा, कॉलेजस कधी सुरु होणार केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याता निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत. मात्र अनेक राज्यांची शाळा सुरू करण्याची तयारी नाही अशी माहिती पुढे आली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

केंद्राने निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय हा त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं केंद्र सरकारने म्हटलं होतं. कोरोनाचा वाढता प्रसार कायम असल्याने शाळा सुरू करण्याबाबत सगळ्यांनाच संभ्रम आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी याबाबत अजुनही स्पष्टपणे आपली भूमिका जाहीर केली नाही. सध्या Online वर्ग आणि अभ्यास सुरू आहे. तो तसाच कायम ठेवावा असं काही राज्यांचं मत आहे. शाळा, कॉलेजेस सुरू झाली तर मुलं एकत्र येणार त्यामुळे पुन्हा कोरोना प्रसाराची भीती आहे.

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा

सॅनिटायजेशन आणि इतर गोष्टींचा खर्चही अनेक शाळांना परवडणारा नाही त्यामुळे सध्याच्या संकटकाळात जबाबदारी नको असं राज्यांना वाटतं आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही.

वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे. शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत. शाळांनीही स्वच्छता आणि कोविडचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं होतं. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

वाचा :- संतापजनक! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

अनलॉकची घोषणा करत अनेक उद्योग आणि बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. पण, अजूनही मंदिर, लोकल रेल्वे सेवा, जीम हे बंद आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कधी अनलॉक होणार याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुर्तास नकार दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरे कारशेड, कोरोनाची परिस्थिती आणि मंदिर उघडण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

वाचा :- मंदिरे सुरू करण्याबाबद मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ वक्तव्य