महाराष्ट्र

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार कायम

11 Oct राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे. सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 10,792 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांच संख्या ही 15,28,226 एवढी झाली आहे. तर 309 रुग्णांचा मृत्यू झाला.

वाचा :- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला धक्कादायक इशारा

राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 40,349 एवढा झाला आहे. तर 10 हजार 461 जणांनी कोरोनावर मात केली. मागील 4 आठवडयातील रुग्णसंख्येचे विश्लेषण केले असता दर आठवडयाला नव्याने आढळणारे बाधित रुग्ण कमी होताना दिसत आहेत.

वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडयात 1 लाख 53 हजार 331 एवढे नवे रुग्ण आढळले होते. त्यांची संख्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात 92 हजार 246 एवढी आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत जवळपास 40 टक्के घट झाली आहे. 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

वाचा :- संतापजनक! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर