महाराष्ट्र

मंदिरे सुरू करण्याबाबद मुख्यमंत्र्यांनी केले ‘हे’ वक्तव्य

सणांपूर्वी सर्वांनी जशी खबरदारी घेतली तशीच यापुढेही घ्या

11 Oct :- धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी राज्यामध्ये भाजपसह विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहे. यासोबतच धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मंदिरे आत्ताच सुरू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धार्मिक स्थळे उघडण्याविषयी बोलले की, ‘ मंदिरे सुरू करण्याचा निर्णय हळूहळू घेतला जाईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू होण्यासाठी भक्तांना आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाचा :- कोरोनाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून गर्दी करू नका असे आवाहन मी सर्वांना करत आहे. आता सणउत्सवांमध्ये सर्व धर्मीयांनी माझे बोलणे ऐकले. आता तर दिवाळी आणि नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे या कालावधीतही आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे.

वाचा :- संतापजनक! धावत्या कारमध्ये केला बलात्कार

यासोबतच चेहऱ्याला मास्क लावणे हे बंधनकारक असणार आहे. यापुर्वीच्या सणांपूर्वी सर्वांनी जशी खबरदारी घेतली तशीच यापुढेही घ्यायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या