सिनेमा,मनोरंजन

कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल

कंगना रणौत नव्या वादाच्या भोवऱ्यात

10 Oct :- अभिनेता सुशांत सिंह प्रकरणानंतर चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत आता आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर गुन्हा दाखल करा. असे आदेश कर्नाटकातील तुमकुर न्यायालयाने पोलीसांना दिले आहे. त्यानंतर आता कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

याचिकाकर्ते रमेश नाईक यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते कंगनाने शेतकऱ्यांचं अपमान केलं असून, तिच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली होती.

वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस

दरम्यान, केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर केली, त्यानंतर देशभरातून मोदी सरकारविरुद्ध शेतकरी तसेच विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत सांगितले होते ही, देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केलं जात आहे. त्यानंतर त्या ट्विटला रिट्विट करत कंगनानं या प्रकरणात उडी मारली होती. त्यांमध्ये तिने आतंकवादी शब्दाचा उल्लेख केला होता. त्या पार्श्वभुमीवर न्यायालयाने कंगनावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहे.

वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर

वाचा :- चीनचा दावा! आम्ही कोरोना पसरवला नाही