‘इतके’ तास मानवी त्वचेवर जिवंत राहतो कोरोना विषाणू
संशोधनामध्ये झाले स्पष्ट!
10 Oct :- कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंवत राहू शकतो, अशी माहिती एका अभ्यासात समोर आली आहे. संशोधकांनी इन्फ्लुएंजा व्हायरस आणि नोव्हल कोरोना व्हायरसचा तुलनात्मक अभ्यास केला असून त्यामधील माहिती जगासमोर मांडली आहे. अभ्यासात म्हटले आहे की मानवी त्वचेवर इन्फ्लुएंजा व्हायरस दोन तास जिंवत राहू शकतो. तर कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर तब्बल नऊ तास जिंत राहू शकतो. याबाबतचं संशोधन क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलं आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
अभ्यासात म्हटले आहे की, दोन्ही व्हायरस हॅण्ड सॅनिटायझरने निष्क्रिय होतात. सतत हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला हवेत, ही बाब क्लिनिकल इन्फेक्शस डिसीजने प्रकाशित केलेल्या अभ्यासावरुन पुन्हा एकदा अधोरेखित होते. सदर संशोधनात प्रामुख्याने जपानच्या क्योटो येथील प्रिफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील संशोधक सहभागी झाले होते. हात स्वच्छ राखणे हा कोरोनाला रोखण्यासाठीचा मुख्य उपाय असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस
जगभरात सध्या 3 कोटी 71 लाख 10 हजार 987 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 69 लाख 77 हजार 08 रुग्ण एकट्या भारतात आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 964 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 59 लाख 85 हजार 505 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारताप्रमाणे अमेरिका आणि ब्राझीलमध्येदेखील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे.
वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर
अमेरिका आतापर्यंत 78 लाख 94 हजार 478 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 लाख 18 हजार 648 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे तर 1 लाख 49 हजार 692 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या