चीनचा दावा! आम्ही कोरोना पसरवला नाही
कोरोना विषाणू तयार केल्याचे आरोप चीनने लावले फेटाळून
10 Oct :- जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. यावरून जगातील अनेक देशांनी चीनवर टीका केली आहे. दरम्यान, आता चीनने शुक्रवारी वेगळाच दावा केला आहे. कोरोना चीनमधून पसरलेला नाही असं चीनने म्हटलं आहे. वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार झाल्याचे आरोप चीनने फेटाळून लावले आहेत.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
चीनने अमेरिकेनं केलेले आरोप फेटाळून लावताना म्हटलं की, गेल्या वर्षी जगातील वेगवेगळ्या भागात कोरोना पसरला होता. मात्र त्याची माहिती सर्वात आधी चीनने दिली. तसंच वटवाघळांपासून माणसांमध्ये कोरोनाचं संक्रमण चीनमध्ये झाल्याचा आरोपही त्यांनी नाकारला.
वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोना व्हायरस हा एक नव्या प्रकारचा व्हायरस आहे. गेल्या वर्षी अखेरच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागात कोरोना पसरला होता. तर चीनने सर्वात आधी या व्हायरसबद्दल जगाला माहिती दिली होती. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनच्या सत्ताधारी पक्षावर आरोप केला होती की, कोरोनावर चीनने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. जगापासून कोरोनाचे सत्य लपवले असंही म्हटलं होतं. यावर चीनने उत्तर दिलं आहे.
वाचा :- नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर
आतापर्यंत जगभरात 3 कोटी 60 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दहा लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकेत आढळले असून जवळपास 76 लाख कोरोनाचे रुग्ण आहेत. याशिवाय 2 लाखांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. जगात कोरोना पसरवल्याचा आरोप होणाऱ्या चीनमध्ये कोरोनाचे फक्त 90 हजार 736 रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे. तर 4 हजार 739 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला.
वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या