नागरिकांनो, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर
सलग 8 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल नाही
10 Oct :- जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. अमेरिकन क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.43 टक्केची घसरण झाल, ज्यानंतर ते 40.60 डॉलर प्रति बॅरलवर आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात सुद्धा शुक्रवारी घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड ऑईलचा भाव 1.13 टक्केच्या घसरणीसह 42.85 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. दुसरीकडे, नॉर्वेच्या ऑईल अँड गॅस असोसिएशन आणि मजदूर यूनियनमधील चर्चा निष्फळ झाल्यानंतर नॉर्वेजियन ऑफशोर ऑईल आणि गॅस क्षेत्रांना मागच्या दिवसांत बंद केले होते. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीला समर्थन मिळाले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
याचा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने स्थानिक बाजारांवर परिणाम झाला. आज लागोपाठ 8 व्या दिवशी स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शनिवारी सुद्धा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा :- मुख्यमंत्री ठाकरेंना उच्च न्यायालयाची नोटीस
पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
मुंबई 87.74 – 76.86
पुणे 87.40 – 75.40
ठाणे 87.31 – 75.28
अहमदनगर 88.32 – 76.30
औरंगाबाद 88.12 – 76.10
बीड 88.32 – 76.30
धुळे 88.30 – 76.28
कोल्हापूर 87.98 – 75.98
नाशिक 88.15 – 76.12
रायगड 87.40 – 75.37
वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या
प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते.
वाचा :- ‘या’ लोकांवर कोरोना लशीचाही होणार नाही परिणाम
ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.