केवळ खबरदारी घेत ‘हा’ देश झाला कोरोनामुक्त
कोरोनमुक्तीचे सेलिब्रेशन साजरे केले देशभरात!
10 Oct :- जगभरात कोरोना विषाणूचे महाकाय थैमान सुरु असताना केवळ ‘खबरदारी’ घेत न्यूझीलंडने कोरोनावर मात केली असून आता तेथे एकही कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. याआधीही न्यूझीलंडने यशस्वीपणे कोरोनावर मात केली होती. यशाचे सेलिब्रेशन देशभरात करण्यात आले. सर्व सहा बाधित बरे झाले असून आता तेथे एकही बाधित रूग्ण नाही.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा सामुहिक प्रयत्न करून कोरोनाच्या संसर्गावर मात केली. ही आमच्यासाठी मोठी बाब आहे. कोरोना संसर्गाची पहिली लाट आल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तयार केलेल्या नियोजनाचा दुसऱ्या लाटेत देखील फायदा झाला. तसेच न्यूझीलंडमध्ये 24 सप्टेंबरपासून एकही नवीन बाधित रूग्ण आढळला नाही.
वाचा :- कोरोनाची सौम्य लक्षण दिसणाऱ्या रुग्णांनी ‘ही’ काळजी घ्या
न्यूझीलंड हा 50 लाख संख्या असलेला देश आहे. दक्षिण पॅसिफिकच्या भागात असलेल्या न्यूझिलंडला इतर देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कसा पसरला याचा अभ्यास करण्यास वेळ मिळाला. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी तातडीने पावले उचलत उपाय योजना केली. तसेच कोरोनाचा पहिला रूग्ण आढळताच अनेक कठोर पावले उचलण्यात आली.
वाचा :- ‘या’ लोकांवर कोरोना लशीचाही होणार नाही परिणाम
परेशातून मायदेशी येणाऱ्या लोकांपासूनही कोरोना पसरू शकतो ही बाबत लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. एकंदरीतच वैज्ञानिक दृष्टीकोन, योग्य उपाययोजना आणि चांगल्या राजकिय नेतृत्वामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले असे तज्ञांनी सांगितले.