Popular News

‘या’ लोकांवर कोरोना लशीचाही होणार नाही परिणाम

तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता!

10 Oct :- कोरोना विषाणूचा झपाट्याने वाढत असलेला फैलाव आटोक्यात येण्याचे काही नाव घेत नाही अशा परीस्ठीमध्ये प्रत्येकालाच कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी लास बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनाव्हायरसविरोधातील लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र कोरोनाची लस आल्यानंतर ही बातमी सर्वांसाठीच दिलासादायक ठरेल असं नाही. काही व्यक्तींवर कोरोनाची लस प्रभावी ठरणार नाही, अशी चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

नार्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेला हा अभ्यास ओबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तीने इतर व्यक्तींवर कोरोना लशीचा परिमाण होणार नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे. लठ्ठ, अति वजन असलेल्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत गंभीर आजार लवकर बळावतात.

वाचा :- मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

लठ्ठपणा म्हटलं की रक्तदाब, मधुमेह असे आजार आलेच आणि हे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाशी लढणं अशक्य होतं. लठ्ठ लोकांना इतक्या समस्या असतात ज्यामुळे त्यांना श्वसनसंंबंधी आजारांमुळे अधिक त्रास होतो. कोरोनाग्रस्त लठ्ठ व्यक्तींचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे, असं याआधी एका संशोधनात दिसून आलं आहे.

वाचा :- अद्याप महाविद्यालय नाही,राज्यातील ग्रंथालये सुरू करणार!

वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये याधी एच1एन1 फ्ल्यूची लस परिणामकारक नव्हती. त्यामुळे आता लठ्ठ व्यक्तींवर कोरोना लशीचाही फारसा परिणाम होणार नाही. अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

वाचा :- सुखद! भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतंय

वाचा :- भारतीय क्रिकेटपटूचा घरात सापडला मृतदेह