भारतीय क्रिकेटपटूचा घरात सापडला मृतदेह
हत्या का आत्महत्या शोध सुरू
10 Oct :- समाज सध्या बधीर होण्याची वाटचालीकडे जाऊ लागला आहे. समाजात अनेक ठिकाणी हत्या आणि आत्महत्यांचे जणू सत्र सुरु झाल्यागत घटना घडत आहेत. आता कळलेल्या माहितीनुसार भारताकडून अंडर-19 क्रिकेट आणि रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला आहे. एम. सुरेश कुमार असं या खेळाडूचं नाव आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
एम सुरेश कुमार यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता एम. सुरेश कुमार यांचा मृतदेह बेडरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना एम.सुरेश कुमार यांच्या मुलाने याबद्दलची माहिती दिली. एम. सुरेश कुमार यांनी 2005 साली त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ते भारताच्या अंडर-19 टीमचाही भाग होते.
वाचा :- मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
केरळच्या अल्लापुझामध्ये राहणारे सुरेश कुमार रेल्वेमध्ये काम करत होते. त्यांच्या मुलाने संध्याकाळी 7.15 च्या सुमारास वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याचं पोलिसांना सांगितलं. प्रथम दर्शनी ही आत्महत्या वाटत असली, तरी आम्ही याची चौकशी करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.डावखुरे स्पिनर असणाऱ्या सुरेश कुमार यांनी 72 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 196 विकेट घेतल्या. तसंच त्यांनी 1,657 रनही केले होते.
वाचा :- अद्याप महाविद्यालय नाही,राज्यातील ग्रंथालये सुरू करणार!
केरळसाठी त्यांनी 52 मॅच तर रेल्वेसाठी 17 मॅच खेळल्या. याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्येही ते सेंट्रल आणि साऊथ झोनसाठी खेळले होते. 1990 साली त्यांनी अंडर-19 टेस्ट टीममध्येही जागा मिळवली होती. 1990-91 साली अंडर-19 टीममध्ये राहुल द्रविड कर्णधार असताना सुरेश कुमार खेळले. सुरेश कुमार यांनी न्यूझीलंडविरुद्ध अंडर-19 मॅच खेळली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या टीममध्ये स्टीफन फ्लेमिंग आणि डियोन नॅश यांच्यासारखे मोठे स्टार खेळाडूही टीममध्ये होते.