महाराष्ट्र

मान्सूनचा मुक्काम वाढला!

हवामान विभागाने दिली माहिती

10 Oct :- काही दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मान्सूनचा पश्चिम राजस्थानमधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला. यामुळे लवकरच राज्यातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. मात्र आता शहरातील नैऋत्य मान्सूनचा मुक्काम यंदा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास हा ८ ऑक्टोबर मान्सून संपणार होता. मात्र ही तारीख गेल्याने असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे डायरेक्टर-जनरल के. एस. होसळीकर यांनी माहिती दिली आहे.

वाचा :- मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

दरम्यान, ‘सध्याची परिस्थिती पाहता राज्यात आणि मुंबईतून मान्सूनने पूर्ण निरोप घेण्यास आणखी ८ ते १० दिवस लागतील. याचबरोबर वर्तवलेल्या अंदाजात सात दिवस इकडे-तिकडे होणे ही सामान्य बाब असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. याचप्रमाणे अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. याचबरोबर या वर्षी हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाच्या सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या. तारीख जुन्या तारखेपेक्षा मुंबईसाठी यावर्षी आगमनाची नवी एक दिवस नंतरची म्हणजेच ११ जून तर मान्सूनचा मुक्काम संपण्याची तारीख २९ सप्टेंबरऐवजी ८ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती.

वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. त्यामुळे रब्बी पेरणीची कामे खोळंबत असल्याची स्थिती आहे. विदर्भात पुन्हा पावसाच्या सरींनी जोर धरला आहे. विदर्भातील भंडारा जिल्हा वगळता अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिडकावा झाला. काही भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यातच खरिपातील विविध पिके काढणीस आल्याने पावसामुळे काढणी खोळंबली आहे.

वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!

वाचा :- सुखद! भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतंय