भारत

सुखद! भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतंय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती!

10 Oct :- भारतात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा आलेख उंचावत असला तरी रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रामण आनंदाचे वातावरण निर्माण करत आहे. भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मागील 24 तासात देशात कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण 10 राज्यातील आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यातही महाराष्ट्रातच सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे झाल्याचे दिसले आहे.

वाचा :-  मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने उतरताना दिसत आहे. सध्या देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 9 लाखाच्या खाली गेला असून तो 8.93 लाखांपर्यंत खाली गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!

मागील तीन आठवड्यांतील देशातील कोरोनाच्या आकडेवारीचा ट्रेंड बदलताना दिसला आहे. 18 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशात कोरोनाच्या 6 लाख 14 हजार 265 कोरोना रुग्णांचं निदान होऊन 6 लाख 49 हजार 908 कोरोनातून बरे झाले होते. या आठवड्यात नवीन रुग्णांपेक्षा जवळपास 33 हजार जास्त कोरोना रुग्ण बरे झाले होते. त्यानंतरच्या आठवड्यात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मध्ये 5 लाख 80 हजार 66 जणांना कोरोनाची बाधा झाली होती तर 5 लाख 98 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले होते.

वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!

वाचा :-  अद्याप महाविद्यालय नाही,राज्यातील ग्रंथालये सुरू करणार!