महाराष्ट्र

अद्याप महाविद्यालय नाही,राज्यातील ग्रंथालये सुरू करणार!

कोरोना संसर्ग कमी झाल्याशिवाय महाविद्यालय सुरू होणार नाहीत – सामंत

10 Oct :- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याशिवाय महाविद्यालय सुरू होणार नाहीत अशी माहिती आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु असेही सामंत म्हणाले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

लवकरच राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अद्याप कोणताही विचार केलेला नाही. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याबाबत विचार होणार आहे. मात्र राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे.

वाचा :- मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

सुरु करताना काय नियम असावा, याबाबत दिवसांमध्ये निर्णय घेऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ग्रंथालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले असून लवकरच ग्रंथालये सुरू होणार असल्याचे सामंत म्हणाले. सीमा भागातील शैक्षणिक संकुलाबाबत बोलताना सामंत म्हणाले, सीमा भागातील शिनोळी या गावात दहा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून याठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे.

वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!

वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!