राजकारण

आम्ही दबाव टाकला नाही, दमदाटीही केली नाही

संभाजीराजेंनी मानले राज्य सरकारचे आभार!

10 Oct :- MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे खासदार संभाजीराजे यांनी स्वागत केलं आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे. यानंतरही राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

आम्ही दबाव टाकला नाही किंवा दमदाटीही केली नाही असंही ते म्हणाले. समाजाने आपले प्रश्न आग्रहाने मांडणे ही धमकी किंवा दमदाटी नाही असंही त्यांनी सांगितलं. समाजातल्या सर्वच घटकांना फायदा व्हावा हाच आमचा उद्देश असल्याचंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!

राज्य सरकारने कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!

वाचा :-  ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मास्क मिळणार अवघ्या 3 रूपयांना!