बीड

आंबेडकर,सदावर्ते विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

भागवत कदम,राजेंद्र निकम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

10 Oct :- प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे यांचा नामोल्लेख न करता ‘बिनडोक राजा’ म्हणत जहरी टीका केली होती. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंबद्दल अपशब्द वापरले. दोन्ही राजेंबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी आंबेडकर आणि सदावर्ते या दोघांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समनवय समितीचे भागवत कदम आणि राजेंद्र निकम यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सातारा शहर पोलिस ठाण्यात दोन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जहरी टीका केली. उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांचा नामोल्लेख न करता ‘एक राजा बिनडोक आहे, तर दुसऱ्याचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर आहे. त्यांना राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्रर्य वाटतं, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी घणाघात केला.

वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!

मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला वंचित आघाडीचा पाठिंबा राहिल, असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं. पाठिंबा देण्यासाठी सुरेश पाटील यांनी आपल्याकडे विनंती केली होती. मराठा आरक्षण वादामुळे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ बिघडू नये, असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर, सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी केलं होतं.

वाचा :- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मास्क मिळणार अवघ्या 3 रूपयांना!

त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांचा समाचार घेतला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी कोणाला घाबरत नाही, ज्या माणसाला घटना माहीत नाही, म्हणूनच आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात.

वाचा :- ‘या’ कारनामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!