‘या’ कारनामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद मागे
अध्यक्ष सुरेश पाटीलांनी दिली माहीती!
9 Oct :- राज्यातील वातावरण मराठा आरक्षणावरुन चांगलेच तापले असून मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी मराठा आरक्षण समितीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण अनेक मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
बंद मागे घेण्याबाबतची घोषणा सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर केली आहे. काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर या संदर्भात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी सांगितले की, रात्री उशीरा बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत आहोत.
दरम्यान आजपासून राज्यात मराठा आरक्षण स्थगितीविरोधात ठोक मोर्चाला सुरुवात झाली असून महिला मोर्चाचे आयोजन तुळजापुरात करण्यात आल आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील समन्वय या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यास सरकार अनुकूल असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि दलित महासंघाकडून वेळेवर परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.