महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मास्क मिळणार अवघ्या 3 रूपयांना!

मास्कचा काळाबाजार रोकण्यासाठी राज्य सरकारने उचलली पावले!

9 Oct :- कोरोना विषानुपासुन स्वतः चा बचाव करण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणजे मास्क आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये मास्क हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे.मात्र मास्क विक्रेते मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा लावत आहे. त्यामुळे नागरिकांची लूट होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर चढ़या भावाने मास्क विकणाऱ्यांना राज्य सरकारने लगाम लावण्यासाठी पाऊल उचलले आहे.

सामान्य जनतेला स्वस्त दरात मास्क व सॅनिटायझर मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एन-९५ मास्क हे साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी लेयरचे मास्क अवघ्या 3 ते 4 रुपयांना मिळतील. तसेच समीतीने सांगितलेल्या निर्णयावर शासन मान्यतेची प्रकिया अंतीम टप्प्यात आहे. तसेच एकदा त्याला मान्यता मिळाली असता शासनाने दिलेल्या किंमतीतच मास्कची विक्री करावी लागणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

समितीच्या अहवालानुसार एन-९५ हा मास्क ४० रूपयांना विकला जात होता. पंरतु कोरोनाचा वाढता अंदाज लक्षात घेता त्यांचा दर ४० वरुन १७५ रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. तर यांच्या दरात सुमारे ४३७.५ टक्के या मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. तर काही ठिकाणी एन-९५ या मास्कची २५० या दराने विक्री चालू होती. तसेच समितीने मास्क उत्पादन करणाऱ्या कंपनीचा गेल्या वर्षाचा व ह्या वर्षाचा २०२० च्या दराची तपासणी देखील केली आहे.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारने मास्क व सॅनिटायझरच्या वापर बंधनकारक केला होता. या कारणांमुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी असून त्याचे दर नियंत्रित असावेत, यासाठी आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. तसेच त्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.

मास्क तयार करणाऱ्या कंपनीच्या कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक त्यांचा नफा सर्व बाबी लक्षात घेऊन मास्कचा दर ठरवण्यात आला आहे. तसेच त्यांमुळे
आरोग्य सेवा पुरवणारे दवाखाने व आरोग्य यंत्रणा यांच्या
खर्च कमी होण्यास मदत होईल असेही टोपे म्हणाले.