महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!
राज्यात 358 जणांचा झाला मृत्यू
8 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 358 जणांचा मृत्यू झाला असून 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
वाचा :- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
काल दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. आज दिवसभरात 15575 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून आतापर्यंत 11,96,441 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!
सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 81.13 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 22,84,204 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,321 जण विविध संस्थांमध्ये क्वारंटाईन आहेत.
वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!