केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
राजकारणाला मोठा धक्का!
8 Oct :- माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चिराग यांनी स्वतः Tweet करून ही माहिती दिली. 3 ऑक्टोबरला पासवान यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात होते.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.’पापा अब इस दुनिया मे नहीं है’ रामविलास पासवान यांच्या मुलानेच दिली वडिलांबद्दल धक्कादायक बातमी.
वाचा :- म्हणून त्या शिक्षकाने शाळेतच थाटला संसार!
वाचा :- दिवाळीनंतरच होणार शाळा सुरु होण्याबाबतचा अंतिम निर्णय!