‘या’ कारणामुळे माही संतापला
माहीने दिला अप्रत्यक्षपणे फलंदाजांना सल्ला
8 Oct :- जगभरात लोकप्रिय असणारा ipl चा रोमांचक हंगाम सुरु झाला आहे. प्रत्येक ipl च्या हंगामात अव्वल असणारी चेन्नईची सध्या पराभवाचा सामना करत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईचा १० धावांनी पराभव करत पॉईंट टेबलमध्ये ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. कोलकात्याने ठेवलेल्या १६८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
झालेल्या पराभवाला कर्णधार महेंद्र सिंह धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. केकेआरने पहिल्या दहा षटकांत ९० धावा दिल्या, परंतु नंतरच्या १० षटकांत त्यांनी केवळ ६७ धावा देत सामन्याला कलाटणी दिली. यावर धोनी म्हणाला, सामन्यात एक टप्पा असा होता की त्यांनी दोन-तीन अप्रतिम षटके टाकली. आम्हीही विकेट्स गमावल्या. त्या मधल्या षटकांत आमची फलंदाजी चांगली झाली असती तर सामन्याचा निकाल वेगळा असता. अशी भावना धोनीने व्यक्त करत फलंदाजांना फटकारले.
वाचा :- फसवणुकीचा नवा ट्रेंड; फेसबुकच्या माध्यमातून होतेय पैशांची लूट!
सुरूवातीला आम्ही नव्या चेंडूवर चांगल्या धावा दिल्या. कर्ण शर्माने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी चोख कामगिरी करत केकेआरला १६७ धावांवर रोखले. परंतु फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. अशा शब्दांत धोनीने फलंदाजांवर संताप व्यक्त केला.
वाचा :- शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’
धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकांत चौकारही मारता आले नाही. अशी खंत व्यक्त करत अशा परिस्थितीत तुम्ही नाविण्यपूर्ण फटके मारायला शिकायला हवे, असा सल्लाही धोनीने अप्रत्यक्षपणे फलंदाजांना दिला.