अभिनेत्री तनुश्री संतापली
तनुश्रीनं दिली संतप्त प्रतिक्रिया!
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित तरुणीवर क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला. यानंतर हॉस्पिटल बाहेर आंदोलन केलं गेलं आणि नंतर कँडल मार्च काढण्यात आला.सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी देखील संताप व्यक्त केला.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचावर वाचा फोडण्यासाठीच्या ‘मी टू’ मोहिमेमुळं चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशातील तरुण मुलं हैवानाचं रुप घेतायत;असं तिनं म्हटलं आहे. करोना लॉकडाऊनमुळं तनुश्री अमेरिकत होती, काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. हाथरस इथं झालेल्या घटनेमुळं प्रचंड दु:खी असल्याचं तिनं म्हटलं आहे.
वाचा – शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’
हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये साठी यामागचं मूळ कारण आपण शोधायला हवं, असं ती म्हणतेय. देशातील तरुण वर्ग, मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय, याचा आपण विचार करायला हवा, असंही तनुश्री म्हणाली. देशात सतत होणाऱ्या घटानांचा त्रास होत असून पुरुषांना स्त्रीयांच रक्षण करण्यासाठी शारिरीक ताकद देवानं जास्त स्त्रीयांपेक्षा जास्त दिली आहे. असं असताना पुरुषांकडून स्त्रीयावर असले अत्याचार होत असतील तर रक्षकच भक्षक होतोय, असं म्हणावं लागेल.
वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!
देशातील बलात्काराच्या घटनांसाठी एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होत असेल तर त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे. सोशल मीडियावर मोहिमा सुरू होतात. पण कालांतरानं त्या थंडही होतात. समोरचा गुन्हेगार कितीही मोठा आणि ताकदवार असला तरी त्याच्यावर समाजाने बहिष्कार घालायला हवा, असं तनुश्रीनं म्हटलं आहे. तसंच इतक्या गंभीर प्रकरणाचा काही लोकं त्याच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी , राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोपही तनुश्रीनं केला.