रियाची तुरुंगातून सुटका!
हायकोर्टाने केला 9 अटींसह जामीन मंजूर!
7 Oct :- ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे. एका महिन्यापासून तुरूंगात असलेल्या रियाची लोअर कोर्टाने दोनदा जामीन याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
अखेर आज तिला दिलासा मिळाला. रियाला रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता रिया भायखळा तुरुंगातून बाहेर आली.ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मिळाला आहे.
वाचा – शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’
एका महिन्यापासून तुरूंगात असलेल्या रियाची लोअर कोर्टाने दोनदा जामीन याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज तिला दिलासा मिळाला. रियाला रियाची एक लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता रिया भायखळा तुरुंगातून बाहेर आली.
वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!
कोर्टाने सांगितले- तुरुंगाबाहेर आल्यानंतर रियाला आपला पासपोर्ट जमा करावा लागेल. ती परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही. मुंबईबाहेर जाण्यापूर्वी तपास अधिका-यांना त्यासंदर्भात माहिती द्यावी लागेल. तसेच, 10 दिवसांत पोलिस ठाण्यात हजेरी लावणे अनिवार्य असेल. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.
वाचा – ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा खुलासा झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 8 सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली होती. रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि अब्दुल बासित यांची जामीन याचिका फेटाळण्यात आली आहे.
वाचा – असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!
या अटींसह रियाची सुटका
तुरुंगातील सुटका झाल्यानंतर 10 दिवस दररोज जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता हजेरी लावावी लागेल.
जामीनासाठी एक लाख रुपये भरावे लागतील.
पासपोर्ट जमा करावा लागेल.
कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकणार नाही.
मुंबईतून बाहेर जाण्यासाठी तपासातील पाच अधिकाऱ्यांना माहिती द्यावी लागेल.
महीन्यातील पहिल्या सोमवारी रियाला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी द्यावी लागेल.
या प्रकरणासंबंधीत कोणत्याही साक्षीदाराला भेटण्याची परवानगी नाही.
न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीदरम्यान रियाला हजर राहावे लागेल.