महाराष्ट्र

‘या’ भागांत परतीच्या पावसाची शक्यता

हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

7 Oct :- मॉन्सूनच्या पावसाने यंदा महाराष्ट्रावर कृपादृष्टी केली आहे. परिणामी अनेक भागातील पिके जास्त पावसामुळे धोक्यात आलेली आहेत. अशावेळी आता पुन्हा एकदा परतीचा मॉन्सून मुसळधार पद्धतीने कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

मागील काही दिवसांतही राज्यभरात तुरळक पाऊस सुरू आहे. मात्र, आता उत्तर अरबी समुद्रातून मान्यूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार आणि हलका पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

वाचा :- शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’

उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्यामुळे या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ पट्ट्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक पावसाचा अंदाज आहे.

वाचा :-  काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!

पश्चिम राजस्थानामधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेनागे पुढे जात आहे. सध्या काढणीला आलेल्या पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. पावसाची उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाने सगळा शेतमाल हा कोरड्या जागी ठेवून त्याला जाकून ठेवावा. धान्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

वाचा – ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’

वाचा – असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!