देश विदेश

अमेरिका, केवळ भुंकत राहणार की चावणारही?

चीनने केली उर्मट शब्दांमध्ये क्वाड बैठकीवर टीका!

7 Oct :- जपानमध्ये चार इंडो-पॅसिफिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक टोक्योत सुरू होत असून मंगळवारी अनौपचारिक चर्चा पार पडली. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे या बैठकीकडे लक्ष लागलेले आहे. अमेरिका, जपान, भारत व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने, भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर व जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांची स्वतंत्र बैठक नंतर होणार आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

चीनच्या वाढत्या प्रभावला शह देण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात या बैठकीमध्ये हे चारही देश महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समधील एका लेखामधून या क्वाड देशांच्या बैठकीवर टीका करण्यात आली आहे. अमेरिका केवळ भुंकताना दिसत होते. केवळ भुंकत राहणार की चावणारही? अशा उर्मट शब्दांमध्ये या लेखामधून कालच्या क्वाड देशांच्या बैठकीबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. ग्लोबल टाइम्सने आपल्या संपादकीय पानावर छापलेल्या एका लेखामध्ये क्वाडची दुसरी बैठक अयशस्वी ठरल्याचा टीका केली आहे.

वाचा –  काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!

त्याचप्रमाणे आता कोणीही अमेरिकेकडे नेतृत्व करणारा देश म्हणून पाहत नसल्याचा हल्लाबोलही या लेखामधून करण्यात आला आहे. आपणच जागतिक स्तरावरील प्रमुख नेतृत्व आहोत हे नाटक अमेरिकेने आता बंद करायला हवं हेच या बैठकीमधून दिसून येत असल्याचा टोलाही लेखामधून लगावण्यात आला आहे. क्वाड देशांची एकजूटही अधिक काळ टीकेल असं वाटत नाही असंही या लेखामध्ये म्हटलं आहे.

वाचा – ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’

मंगळवारच्या अनौपचारिक चर्चेनंतर क्वाड देशांनी कोणतेही संयुक्त पत्रक जारी केलं नाही याकडेही या लेखामधून लक्ष वेधण्यात आलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी मंगळवारी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेऊन आधी अनौपचारिक चर्चा केली. त्यांनी चीनच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली आहे.

वाचा – असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!

पॉम्पिओ यांनी चीनच्या एकाधिकारशाहीच्या कारवायांबाबत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पायने यांच्याजवळ चिंता व्यक्त केली. इंडो-पॅसिफिक भागात शांतता नांदावी यासाठीच क्वाड देशांचे प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दक्षिण आणि पूर्व चीनी समुद्र, मेकांग, हिमालयाचा परिसर आणि तैवानच्या खाडीमध्ये चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना शोषण, जबरदस्ती आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हेकेखोरी करत असल्याचा टोला पॉम्पिओ यांनी लगावला होता.

वाचा :- शनिवारी महाराष्ट्र राहणार ‘कडकडीत बंद’

याचवरुन चीनने अमेरिकेचा जपान आणि ऑस्ट्रेलियाबरोबर आधीपासूनच लष्करी करार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेला सध्या भारताबरोबर लष्करी करार करण्यात स्वारस्य आहे. भारताबरोबर असा करार करुन चीनला उकसवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा दावा या लेखामध्ये करण्यात आला आहे.

वाचा :- अजय देवगणच्या भावाचे निधन