सिनेमा,मनोरंजन

अर्जुन कपूरने चाहत्यांना केली विनंती

मलायकानंतर अर्जुन सुद्धा कोरोनामुक्त!

7 Oct :- हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या चपेटीत अडकला होता. अभिनेत्री मलायका अरोरानंतर आता तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरनेही कोरोनाव्हायरसवर मात केली आहे. तब्बल एक महिन्यांनंतर अर्जुनने कोरोनाशी झुंज दिली आणि अखेर त्याने हा लढा जिंकला आहे. आपली कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्याची बातमी अर्जुनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर दिली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

कोरोनाशी लढल्यानंतर आपल्या आलेल्या अनुभवातून त्याने चाहत्यांनाही कळकळीची विनंती केली आहे. कोरोनामुक्त होताच अर्जुन कपूरने इस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट केली. अर्जुन म्हणाला, “माझी कोरोनाव्हायरस टेस्ट नेगेटिव्ह आली आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. आता पूर्णपणे बरा झालो आहे, मला खूप चांगलं वाटतं आहे. आता कामावर पुन्हा परतण्याची उत्सुकता आहे” अभिनेत्री मलायका अरोरानंतर आता तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरनेही कोरोनाव्हायरसवर मात केली आहे.

वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!

तब्बल एक महिन्यांनंतर अर्जुनने कोरोनाशी झुंज दिली आणि अखेर त्याने हा लढा जिंकला आहे. आपली कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्याची बातमी अर्जुनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. कोरोनाशी लढल्यानंतर आपल्या आलेल्या अनुभवातून त्याने चाहत्यांनाही कळकळीची विनंती केली आहे. कोरोनामुक्त होताच अर्जुन कपूरने इस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट केली. अर्जुन म्हणाला, “माझी कोरोनाव्हायरस टेस्ट नेगेटिव्ह आली आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. आता पूर्णपणे बरा झालो आहे, मला खूप चांगलं वाटतं आहे. आता कामावर पुन्हा परतण्याची उत्सुकता आहे”

वाचा – ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’

अर्जुन कपूरला 6 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नव्हती. त्यामुळे तो होम क्वारंटाइन झाला होता. त्याने घरीच उपचार घेतले. त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. एक महिना उपचार घेतल्यानंतर त्याची टेस्ट आता नेगेटिव्ह आली आहे. हे देखील त्याने सोशल मीडियावर सांगितलं.

वाचा – असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!

अर्जुननंतर मलायका अरोरालाही कोरोना झाला होता. तिच्यामध्येही कोरोनाची लक्षणं नव्हती. तिनेदेखील घरीच उपचार घेतले. कोरोना झाल्यानंतर 15 दिवसांनंतर 20 सप्टेंबरला तिने कोरोनावर मात केली. काही दिवसांपूर्वीच ती घराबाहेरही पडली होती.

वाचा – अजय देवगणच्या भावाचे निधन