मुख्यमंत्री ठाकरेंसह कुटुंबीयांची झाली आरोग्य तपासणी
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम सुरू!
राज्यात सुरु असलेल्या कोरोना वादळाला थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घराघरांमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू केली आहे. याअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य पथकाने मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची आरोग्य तपासणी केली.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
बीएसीचे आरोग्य पथक वांद्रे पूर्व येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर दाखल झाले.
वाचा :- ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’
यावेळी या आरोग्य पथकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी केली. यात त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले.