अजय देवगणच्या भावाचे निधन
देवगण कुटुंबाला मोठा धक्का!
6 Oct :- जीत,जान, इतिहास, प्यार तो होना ही था आणि हिंदुस्थान की कसम या सुपरहिट चित्रपटांचे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध असणारे आणि लोकप्रिय अभिनेता आज देवगणचे भाऊ चुलत भाऊ अनिल देवगण यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
अनिल देवगण यांनी आपल्या कारकीर्दीतील बहुतेक काम अजय देवगणसोबत केले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ते 51 वर्षांचे होते. अजयने मंगळवारी दुपारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. कोरोनाच्या सद्य परिस्थितीमुळे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे अजयने सांगितले.
वाचा :- ‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’
अनिल देवगण यांच्या निधनाची माहिती देताना अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘काल रात्री मी माझा भाऊ अनिल देवगणला कायमचे गमावले. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अजय देवगण फिल्म्स आणि मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. कोरोनामुळे प्रार्थना सभा घेण्यात येणार नाहीये,’ असे अजयने ट्विटमध्ये सांगितले.