‘इतक्या’ रुपयांना मिळणार भारतामध्ये ‘कोरोना लस’
२०२१ पर्यंत २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार!
6 Oct :- देशभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळत असल्याने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या या संकटाला थोपवण्यासाठो एक प्रभावी लसीची आत्यावश्यकता आहे.कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता जगभरात प्रभावी लस बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जुलै २०२१ पर्यंत २०-२५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी दिलासादायक माहिती रविवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली होती.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
मात्र, इतक्या लोकांना कोरोना लस टोचवण्यासाठी भारतास सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत चार ते पाच डॉलर म्हणजेच ३०० ते ४०० रुपये असण्याची शक्यता असून, त्यानुसार खर्चाचा अंदाज लावण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या एका डोसची किंमत एका हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे संकेत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिले आहेत. तसेच २० ते २५ कोटी लोकांचे लसीकरण करण्यासाठी ४० ते ५० कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करण्याची आवश्यकता भासणार आहे.
वाचा :- असे काय केले? 4 दिवसातच ट्रम्प कोरोनामुक्त झाले!
भारतास कोरोना लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन जागतिक आरोग्य संघटना गेट्स फाऊंडेशनप्रणित ग्लोबल व्हॅक्सिन अलायन्स (गावी), लसउत्पादन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी दिले आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीचे उत्पादन करणार आहे. तर अमेरिका, इंग्लंड, युरोप खंडातील काही देशांनी कोरोना लस विकसित करण्यासाठी संशोधन करणाऱ्या औषध कंपन्यांशी करार केला आहे. पण भारत सरकारने असा करार कोणत्याही कंपन्यांशी केला नाही.
वाचा – ‘या’ तारखेला होणार MPSC परीक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या कृती समितीचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल जगभरातील कोरोना लसी संदर्भातील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि भारत बायोटेक-आयसीएमआर हे स्वतंत्र रित्या कोरोना लस शोधण्यासाठी करत असलेल्या प्रयोगांवर भारताच्या आशा आहेत.
वाचा – मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सुरु होणार सिनेमागृह
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतात प्रत्येकास कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी ८० हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आलेला अंदाजित आकडा त्याच्याहून कमी आहे.
वाचा – काजल अडकणार लग्नाच्या बेडीत; शुभेच्छांचा वर्षाव सुरु!