काजल अडकणार लग्नाच्या बेडीत; शुभेच्छांचा वर्षाव सुरु!
उद्योगपतीशी बांधणार लग्नगाठ!
6 Oct :- सिंघम या चित्रपटातून अधिक लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. मीडिया अहवालानुसार काजल गौतम किचलू या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलूगू चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली काजल लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र याबाबत अद्याप काजल किंवा गौतम यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
प्राप्त झालेल्या माहितीनुसार काजल आणि गौतम गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांसोबर काही मंदिरांना भेटी देताना पाहायला मिळाले. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही चाहत्यांकडून काजलला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा मिळत आहेत. काजलने इन्स्टाग्रामवर सोमवारी एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने केवळ एक हार्ट इमेज पोस्ट केली आहे. त्यावर देखील तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!
मीडिया अहवालानुसार मोठ्या धुमधडाक्यात काजलचं लग्न होणार आहे. लॉकडाऊननंतर धुमधडाक्यात पार पडणारं हे पहिल सेलिब्रिटी वेडिंग असेल. गौतम एक बिझनेसमन, इंटिरियर डिझायनर आहे. या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांना निमंत्रण असेल, अशी देखील माहिती समोर येते आहे. काजलने ‘क्यों हो गया ना’ या सिनेमातून 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
वाचा – ‘या’ तारखेला होणार MPSC परीक्षा
ऐश्वर्या राय-बच्चन आणि विवेक ऑबेरॉय स्टारर या सिनेमात तिने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. दक्षिणेत काजलची मोठी फॅन फॉलोइंग आहे. 2011मध्ये ‘सिंघम’ मुळे ती पुन्हा एकदा हिंदी सिनेमात प्रकाशझोतात आली. काजल आता ‘मुंबई सागा’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.