Popular News

मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी सुरु होणार सिनेमागृह

केंद्र सरकारने केली नियमावली जाहीर!

6 Oct :- गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह सुरु होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. अनलॉक- ५ मध्ये हॉटेल,रेस्टोरंट,बार आणि सिनेमागृह सुरु करण्यात येत आहे. विविध उद्योग पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत. मार्च महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आता अखेर उघडण्यात येणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

सिनेमागृहाच्या एकूण प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के लोकांना एकावेळी सिनेमा पाहता येणार आहे. दरम्यान याकरता केंद्र सरकारकडून सिनेमांच्या प्रदर्शनासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. या नियमांनुसार काही कडक नियम पाळणे अनिवार्य असणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सिनेमांचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक एसओपी जारी केले आहेत.

वाचा – शाळा होणार सुरु; मात्र केंद्राने घातल्या ‘या’ अटी

  1. सिनेमागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी
  2. थिएटरमध्ये बसताना योग्य फिजिकल डिस्टंन्सिंग
  3. ‘येथे बसू नये’ असे सीट्सवर मार्क करणे आवश्यक
  4. हँडवॉश आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे
  5. मोबाइलमध्ये आरोग्य सेतू App असणे गरजेचे
  6. थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक. केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल
  7. स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण आणि कोणत्याही आजार असल्यास त्याबाबत अहवाल देणे.

वाचा – काळजी घेण्याची गरज; ‘WHO’ ने दिला ‘धक्कादायक’ इशारा!

  1. वेगवेगळ्या स्क्रीनसाठी वेगवेगळ्या वेळा असणे आवश्यक
  2. पेमेंट करताना डिजिटल पद्धतींना प्रोत्साहन
  3. बॉक्स ऑफिस आणि इतर भागात नियमित स्वच्छता, डिसइन्फेक्शन करावे
  4. बॉक्स ऑफिसवर आवश्यक काऊंटर उघडली जावी
  5. मध्यांतराच्या वेळी प्रेक्षकांनी गर्दी टाळावी
  6. सोशल डिस्टंन्सिंगसाठी बॉक्स ऑफिसमध्ये जागोजागी मार्किंग केले जावे
  7. तिकिट खरेदी पूर्ण दिवस सुरू असावी, गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकिट बुकिंगची सेवा द्यावी
  8. थुंकण्यास सक्त मनाई.

वाचा – ‘या’ तारखेला होणार MPSC परीक्षा

  1. सिनेमागृहातील स्टाफसाठी आवश्यक सुरक्षा असणे गरजेचे. उदा. ग्लोव्ह्ज, मास्क, पीपीई इ.
  2. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंगसाठी मोबाइल नंबर देणे आवश्यक
  3. बॉक्स ऑफिसवर आवश्यक काऊंटर असणे गरजेचे
  4. कोव्हिड-19 संदर्भातील अनियंत्रित वर्तन कठोरपणे हाताळले जावे
  5. हॉलमधील एसीचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सिअस असावे
  6. सिनेमा सुरू होण्याआधी, मध्यांतरावेळी आणि सिनेमां संपल्यावर मास्क घालण्याबाबत, फिजिकल डिस्टंसिंगबाबत आणि हायजिनबाबत घोषणा केली जावी.

वाचा – ठाकरे सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय

  1. पार्किंगच्या ठिकाणी आणि सिनेमागृहाबाहेर गर्दी योग्य पद्धतीने हाताळली जावी
  2. Do’s and Don’ts सिनेमागृहाच्या आवारात विविध ठिकाणी लावण्यात यावेत
  3. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आल्यास परिसरात डिसइन्फेक्शन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक
  4. याठिकाणी कर्मचारी ‘हाय रिस्क’वर असल्याने, त्यांचा थेट लोकांशी संपर्क टाळावा

वाचा – पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता

वाचा –  राजेश टोपेंच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न