भारत

मोदी आणि शी जिनपिंग येणार आमने-सामने

मोदी आणि शी जिनपिंग यांनी वेधले जगाचे लक्ष

5 Oct :- भारत आणि चीनदरम्यानचा सीमेवरचा तणाव अजुनही कायम आहे. लष्करी आणि मंत्रिस्तरावर चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच एका परिषदेत सहभागी होणार आहेत. 17 नोव्हेंबरला BRICS राष्ट्रांची बैठक होणार असून त्यात सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच हे नेते आमने-सामने येणार असल्याने सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती.

वाचा :- शाळा होणार सुरु; मात्र केंद्राने घातल्या ‘या’ अटी

दरम्यान, भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं स्पष्ट आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने भारताची स्थिती मजबूत झाली आहे. याचा धसका पाकिस्तान आणि चीनने घेतल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे.

वाचा :- ठाकरे सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय

या तणावात अमेरिकाही भारताच्या बाजूने असून आणीबाणीच्या प्रसंगात भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता