महाराष्ट्र

ठाकरे सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय

खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती!

5 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात सर्वत्र अनलॉकचे सत्र राबवण्यात येत आहे. नुकतीच अनलॉक ५ ची निअमवाली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक ५ मध्ये हॉटेल,रेस्टोरंट,बार सुरु करण्यात आली आहेत. यानंतर राज्यात आता धार्मिक स्थळ सुरु करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आजपासून राज्यातील रेस्टॉरंट सुरू होत आहेत. हळूहळू इतरही गोष्टी सुरू होताना दिसत आहेत. अशा वेळी मंदिरे सुरू करण्याची मागणी होताना दिसते.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यातील विविध धार्मिक गटांशी चर्चा करत आहेत आणि मंदिरे खुली करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यातील रेस्टॉरंट त्यांच्या 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक संस्थांच्या परवानगीने सुरु होणार आहेत मग मंदिरे कधी सुरू होणार या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

वाचा :-शाळा होणार सुरु; मात्र केंद्राने घातल्या ‘या’ अटी

मुख्यमंत्र्यानी सुरवातीपासूनच सांगितले आहे कि राज्यात अनलॉकची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल. रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरू करु शकतो. पण मंदिरांच्या बाबतीत हे शक्य नाही असे ते म्हणाले. .याबाबत मुख्यमंत्री राज्यातील सर्व धार्मिक गटांशी चर्चा करत आहेत लवकरच मंदिरे खुली करण्याबाबत मुख्यमंत्री लवकरत निर्णय घेतील असे राऊत म्हणाले.

वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता