महाराष्ट्र

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं

महाराष्ट्राचे आजचे कोरोना अपडेट!

5 Oct :- राज्यात कोरोना विषाणूचा कहर गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. आज मात्र सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.कोरोना विषाणूच्या भरधाव गाडीचा गेर टॉपवरच आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होताना दिसू येत आहे.मात्र आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. तरी आजही रुग्णवाढ मात्र चिंताजनकच आहे.सध्य परिस्थितीमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणखी एक कोरोना लाट येती की काय असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होत आहेत. मात्र मृत्यूची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नव्या पेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढल्याने राज्याचा Recovery Rate हा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे.

वाचा :- शाळा होणार सुरु; मात्र केंद्राने घातल्या ‘या’ अटी

सोमवारी 12 हजार 982 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 62 हजार 585 एवढी झाली आहे.राज्यात दिवसभरात 10 हजार 244 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 263 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 71 लाख 69 हजार 887 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 14 लाख 53 हजार 653 म्हणजे 20 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2 लाख 52 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता