भारत

शाळा होणार सुरु; मात्र केंद्राने घातल्या ‘या’ अटी

मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही!

5 Oct :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अनलॉकचे सत्र सुरु आहे. नुकतीच केंद्र सरकारने अनलॉक ५ ची निअमवाली जाहीर केली आहे. अनलॉक ५ मध्ये हॉटेल,रेस्टोरंट,बार सुरु करण्यात आले आहे. देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

त्या नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात असं सांगत नव्या नियमांमध्ये अनेक अटीही टाकण्यात आल्या आहेत.

वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता

नियम व अटी
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही,
राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात,
पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल,
मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही,
मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात,
शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये,
मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत,
शाळांनीही स्वच्छता आणि कोविडचे सुरक्षा नियम कडकपणे पाळावे असेही शिक्षण मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

वाचा :- राजेश टोपेंच्या बैठकीदरम्यान शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न