खळबळजनक! भावाने केला बहिणीवर बलात्कार
महाराष्ट्रात नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ
5 Oct :- एकीकडे कोरोना विषाणूच्या महाकाय थैमानामध्ये मनुष्य जातीची फरफट होत आहे आणि दुसरीकडे समाजामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी प्रकारांमुळे संतापाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. राज्यात एकानंतर एक नात्याला काळिमा लावणाऱ्या घटना घडत आहेत तर गुन्हेगारीचे प्रकरण सुद्धा वाढू लागले आहेत. स्त्री अत्याचार देखील वाढताना दिसत आहे. अशीच एक माणुसकीला कलंक लावणारी घटना महाराष्ट्र राज्यात घडली आहे.
दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!
भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. संगमनेर तालुक्यात ही घटना घडली.चुलत भावाने बहिणीवर सातत्याने अत्याचार केले. यातून अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आरोपी भावावर अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा :- पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता
संगमनेर शहर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नात्यातीलच व्यक्ती जर आयुष्य उद्धवस्त करणार असेल तर मुलींनी समाजात जगायचं कसं, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
वाचा :- धक्कादायक! पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार
वाचा :- शरद पवारांनी टोचून घेतली करोनावरील लस?; नेमकं काय घडलं जाणून घ्या