सिनेमा,मनोरंजन

पुन्हा कपिल शर्मा शो बंद पडण्याची शक्यता

कपिल शर्मा शो पुन्हा संकटात

5 Oct :- घराघरांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत खळखळून हसवणारा द कपिल शर्मा शो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.सुरुवातीच्या काळात तुफान चाललेल्या कपिल शर्माच्या शोला आजकाल जणू ग्रहणच लागलं आहे. कधी शोमधील सहकलाकार शो सोडून जातात, तर कधी सेटला आगच लागते. कपिल शर्मासमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

ट्विटरवर चक्क #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.कपिलमुळे बरेचदा हा शो संकटात सापडतो. पण यावेळी लोक कपिलपेक्षा सलमान खानवर नाराज आहेत. सलमान या शोचा निर्माता आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला सलमान खानलाही जबाबदार ठरवण्यात आलं होतं. नेटकऱ्यांचा सलमानवरचा राग अजूनही गेलेला दिसत नाही.

वाचा :- धक्कादायक! पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार

सलमान खानवर आरोप आहे की, तो त्याच्या ओळखीच्याच लोकांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देतो. सलमान खानवर नेपोटिझमचा आरोप करण्यात येत आहे. याआधी काही एपिसोडचाही नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘द कपिल शर्मा शो’चे काही नवीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असलेल्या शोला पुढे प्रेक्षकांचा कितपत पाठिंबा मिळणार हे येणारा काळच ठरवेल.

वाचा :- शरद पवारांनी टोचून घेतली करोनावरील लस?; नेमकं काय घडलं जाणून घ्या