भारत

धक्कादायक! पोलीस आयुक्तालयाजवळ गोळीबार

सुरक्षा व्यवस्थेबद्दल होतेय चिंता व्यक्त!

5 Oct :- कोरोना विषाणूच्या महाकाय थैमानामुळे त्रस्त असणारे नागरिक समाजात घडणाऱ्या गुन्हेगारगारी प्रकरणामुळे भयभीत होऊ लागले आहेत.पुण्यात सोमवारी सकाळपासून घडलेल्या दोन घटनांनी शहर हादरून गेलं आहे. सकाळी एका गुंडाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी पोलीस आयुक्तालयाच्या जवळच गोळीबार झाला. यात हल्ले खोरांनी एका व्यक्तीवर फैरी झाडून त्याची हत्या केली.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

गंभीर जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.घटनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयही जवळच आहे. त्याच कार्यालयातून ही व्यक्ती निघालेली होती. त्यानंतर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.

वाचा :- भारतात कधी आणि कुणाला मिळणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा

हा अतिशय वर्दळीचा भाग आहे. याच भागात अनेक आंदोलने होत असतात त्यामुळे तिथे कायम पोलीस बंदोबस्तही असतो. अशा भागातच ही घटना घडल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहोचले असून फरार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

वाचा :- हाथरस प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

वाचा :- शरद पवारांनी टोचून घेतली करोनावरील लस?; नेमकं काय घडलं जाणून घ्या