फेसबुकमुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होतो परिणाम; अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड
मुंबई, 2 ऑक्टोबर : फेसबुकमुळे (Facebook) तुमचा आनंद वाढण्यापेक्षा कमी होतो व याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्याचा तुम्हाला विश्वास पटणार नाही. मात्र हे खरं आहे. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. सोशल मीडिया Social Media प्लॅटफॉर्म आपल्या चांगल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पाडत असल्याचं एका अभ्यासातून सांगण्यात आलं आहे. ‘द इंडिपेंडेंट’च्या रिपोर्टनुसार, हा अभ्यास दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आला आहे.
प्रत्येकजण दररोज फेसबुकवर सरासरी 50 मिनिटं घालवतो
कॅलिफोर्निया विद्यापिठाचे संशोधक हॉली बी शाक्य आणि येल विद्यापिठाचे निकोलस ए क्रिस्टाकिस यांनी या अभ्यासाचं नेतृत्त्व केलं आहे. 2016 मध्ये फेसबुकद्वारा उपलब्ध डेटानुसार, प्रत्येकजण दररोज सरासरी 50 मिनिटं फेसबुकवर घालवतो. अभ्यासांतर्गत 2013, 2014 आणि 2015 मध्ये 5208 विषयांवर रिसर्च केलं. प्रत्येक विषयाच्या उपक्रमांना दोन वर्ष मॉनिटर करण्यात आलं होतं.
व्यक्तीमत्त्वावर नकारात्मक परिणाम
फेसबुकवर केल्या गेलेल्या रिसर्चवर असा निष्कर्ष काढण्यात आला की, चांगल्या व्यक्तीमत्त्वावर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्याशिवाय असंही आढळलं की, स्टेटस अपडेट करणं, एखाद्या लिंकवर क्लिक करणं, लिहिणं यासारख्या गोष्टींमुळे पाच ते आठ टक्के लोक मानसिक कमतरतेशी निगडित होते. या दरम्यान, युजर्सचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थही अभ्यासलं असल्याचं संशोधकांनी सांगितलं. यात लाईक्स, फेसबुक फ्रेन्डसची संख्या आणि फेसबुकवर घालवलेल्या तासांचं विश्लेषण केलं आहे. हे विश्लेषण युजर्सच्या अकाऊंटवर लक्ष ठेवून करण्यात आलं आहे.
ऑनलाईन संभाषण
सोशल मीडियावरील संभाषणांमुळे मानवी संवादाचा केवळ भ्रम निर्माण होत असल्याचा, या संशोधनातून इशारा देण्यात आला आहे. या संभाषणात समोरासमोर होणाऱ्या संभाषणाप्रमाणे फायदा होत नाही. ऑनलाईन संभाषण करण्याऱ्यांमध्ये, ऑफलाईन बोलणाऱ्यांच्या तुलनेत अधिक नकारात्मकता असल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे.