राजकारण

‘अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी देशवासियांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगात कुणालाही घाबरणार नाही आणि अन्यायासमोर कधीही झुकणार नाही’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी ट्विटरवर शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गुरुवारी बहिण आणि काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवण्यात आलं होतं. पोलिसांकडून रस्त्यातच धक्काबुक्की आणि अटक करण्यात आलेल्या राहुल गांधींनी आज मागे हटणार नसल्याचंच सूतोवाच आपल्या या ट्विटमधून केलंय.

गुरुवारी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना अत्याचारीत कुटुंबाची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं. नोएडातल्या यमुना एक्सप्रेस – वेवर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नोएडा प्रशासनानं त्यांच्याविरुद्ध महामारी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना सोडण्यात आलं.

‘मी जगातील कुणालाही घाबरणार नाही… मी कोमत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्यानं विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन’ गांधी जयतीच्या शुभेच्छा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय.