क्रीडा

हिटमॅनने घातली नव्या विक्रमला गवसणी!

5 हजार धावा पूर्ण करणारा रोहित ठरला तिसरा खेळाडू!

1 Oct :- भारतीय क्रिकेट संघामधील प्रतिभावंत खेळाडू आणि हिटमॅन या नावाने करोडो चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेला रोहित शर्मा याने आज क्रिकेटमधील नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल मधील 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. रोहित शर्माला 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 2 धावा आवश्यक होत्या.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा!

किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार ठोकत 5 हजार धावांचा टप्पा रोहितने पूर्ण केला. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरलाय. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

वाचा :- धक्कादायक! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पाच हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू आहे. रोहित आता तिसरा खेळाडू ठरला आहे.रोहित शर्माने आयपीएलमध्ये आजच्या सामन्यापूर्वी 191 सामने खेळले आहेत. या 191 सामन्यात रोहित शर्माने 131 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 998 धावा केल्या आहेत.

वाचा :- राहुल गांधी,प्रियांका गांधींना पोलिसांनी केली अटक!

या खेळीमध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, रोहित शर्माने आयपीएलमधील षटकारांचं द्विशतक पूर्ण केलं आहे. तर रोहितने बॉलिंगनेही कमाल केली आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 15 विकेट घेतले आहेत. यात एका हॅट्रिकचा समावेश आहे.

वाचा :- देश हादरला! डोकं चिरडून मुलीची हत्या; बलात्कार केल्याचा संशय